चाळीसगांव नगरपालिकेच्या १८ प्रभागातील ३६ जागांसाठी आरक्षणाची सोडत आज
आरक्षण सोडतकडे इच्छुकांचे लक्ष

चाळीसगांव, प्रतिनिधी,रणधीर जाधव :-
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडत काल निघाल्यानंतर चाळीसगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले निघाले आहे. आता शहरवासीयांना उत्सुकता वाढली आहे ती म्हणजे प्रभाग निहाय आरक्षण सोडतिकडे, नगराध्यक्षपद पदाचे आरक्षण खुले झाल्याने शहरातून
नगराध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा होतांना दिसत आहे. आता आज होणाऱ्या आरक्षण सोडतिकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज दिंनाक ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता चाळीसगांव नगरपरिषदेच्या एकूण १८ प्रभागातील ३६ जागांसाठी नगरसेवक पदासाठीच्या आरक्षण सोडत प्रांतधिकारी प्रमोद हिले आणि नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या सभागृहात काढले जाणार आहे. लोकसंख्या आधारानुसार एससी जागांचे तर ओबीसी प्रवर्गाच्या जागां २७ टक्के नुसार चिठ्ठयांच्या आधाराने तर एकूण आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती जागांपैकी ५० टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवत मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे. चाळीसगांव नगरपलिकेच्या सभागृहात दोन वर्षापूर्वी काढण्यात आलेली नगरसेवकपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र नव्या अधिसूचनेनुसार ती रद्द होऊन आता नव्याने नगरसेवक पदाची आरक्षण काढली जाणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी इच्छूक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रांतधिकारी प्रमोद हिले व नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.