हेमंत करकरेंना लागलेली गोळी RSS समर्थकाची? या काँग्रेसन नेत्याच्या वक्तव्याने वातावरण चिघळलं
काँग्रेस नेत्याच मोठं वक्तव्य शहीद हेमंत करकरेंना कसाबने नव्हे तर RSS समर्थक पोलिसांनी घातली होती गोळी?
मुंबई– काँग्रेस नेत्याच्या एका वक्तव्याने वातावरण चिघळलं आहे. 26/11 च्या हल्ल्यात हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती तसेच कोणत्याही अतिरेक्याची नव्हती. करकरेंना RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली गोळी लागली होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोणी असेल तर तो उज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी दिले आहे. काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चिघळलं आहे.
26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी आतंकवादी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. करकरेंना लागलेली गोळी RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली होती. असे धक्कादायक वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला आहे. संशय व्यक्त करत त्यांनी माझी पोलीस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आहे. पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. कसाब सोबत असलेल्या एकाही अतिरिकेच्या बंदुकीतली नव्हती. तर ती गोळी मुंबई पोलीस दलात असलेल्या एका RSS समर्थक पोलिसाच्या बंदुकीतली होती. त्यावेळी हे सर्व पुरावे उज्वल निकम यांनी लपवले. आणि अशा देशद्रोह्याला भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अशा देशद्रोह्यला पाठीशी घालणारा भाजप पक्ष आहे. असा हल्ला राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर चढवला आहे. माजी पोलीस अधिकारी एस.एस. मुस्लिम यांच्या पुस्तकाचा आधार घेऊनच मी म्हटलं आहे. आणि त्यावेळी उज्वल निकमांनी ती बाजू का मांडली नाही. असही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने मात्र राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.