मराठा आरक्षण मिळाल्याने चाळीसगावात सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष

चाळीसगाव (रणधीर जाधव, प्रतिनिधी):-
गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणसाठी मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले होते राज्य सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करून, तसा GR ही शासनाने जारी केला आहे. यामुळे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण लागू होणार आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश असून मराठा समाजातर्फे सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने चाळीसगावात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर सदस्य यांनी मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्यासह शासन निर्णय दिला तसेच महिनाभराच्या आत सातारा गॅजेट आणि औंध गॅझेट लागू करणे बाबत ग्वाही दिली त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी तरुण तरुणींना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळेल. या निर्णयामुळे मराठा समाजाला फायदा होणार आहे. चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, घोषणाबाजीकरत जल्लोषा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जे आरक्षण सरकारने दिले आहे हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी संपूर्ण शासनाचीच राहील शासनाने मराठा समाजाशी दगा फटका करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी लक्ष्मण शिरसाठ पाटील, गणेश पवार, दिलीप पाटील, डी एस मराठे, खुशाल बिडे, खुशाल पाटील, प्रतिभा पवार, अनिता शिंदे, सुनील पाटील, प्रवीण पाटील, विठ्ठल राजपूत, अविनाश काकडे, सतीश पवार, सचिन जाधव, राकेश राखुंडे, प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर कोल्हे, भरत नवले, राजु शिंदे, सुधीर पाटील, केशव, पाटील, सचिन गायकवाड, प्रदिप मराठे, सचिन पवार, संदीप जाधव, ईश्वर पवार, भिकन पाटील, मुकुंद पवार, स्वप्निल गायकवाड, सतीश पवार, अनिल कोल्हे, राजेंद्र पाटील, शंकर पवार, रमेश पवार, सुनील पवार, अभिजीत शिंदे, कुणाल पाटील, सुनील पाटील, गुलाबराव गायके, प्रशांत गायकवाड, संजय मांडोळे, निवृत्ती एरंडे, सुखदेव निकुंभ, अशोक जगताप, रमेश गोल्हार, अरुण गायकवाड, सुनील पाटील, नंदकिशोर जाधव, दगाजी गुंजाळ यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.