चाळीसगावात गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून बापलेकावर हल्ला
शुल्लक कारणावरून फायटरने केले वार

चाळीसगाव, प्रतिनिधी:- रस्त्याने जात असताना हॉर्न वाजवल्याचा राग मनात घेऊन काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी बाप आणि लेकावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करत दोघांनाही गंभीर रित्या जखमी केले. या संदर्भात जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
शहरात कुठे घडला प्रकार ?
चाळीसगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील रहिवासी जयेश सचिन वाणी वय वर्ष 23 आणि त्याचे वडील सचिन वाणी बुधवारी रात्री नऊ नऊ वाजता दुचाकीने दुकान बंद करून कॅप्टन कॉर्नरवरून आपल्या घराकडे जात असताना याच दरम्यान दोन अज्ञात तरुणांनी रस्त्यावर आडवे येत त्यांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजविला याचाच राग मनात घेऊन त्या तरुणांनी शिवीगाळ केली. दोघेही बापलेक यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना, यातील एकाने खिशातून फायटर काढून जयेशच्या डोक्यावर वार करत त्याला गंभीर दुखापत केली. यात सचिन वाणी यांनी त्यांना प्रतिकार केला, नंतर ते तिथून निघून गेले, डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने जयेश याला स्वराज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले व सचिन वाणी साहित्य ठेवण्यासाठी घरी गेले. थोड्यावेळाने ते तरुण पुन्हा हॉस्पिटल जवळ आले. मारहाण करणारे दोघी अनोळखी मुलं शहरातील दोघांना घेऊन आले व पूर्ण शिवीगाळ करू लागले. सचिन वाणी वाणी यांनी त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एकाने सचिन वाणीच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यार मारून गंभीर दुखापत केली. यात त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असताना त्यातील एका संशयिताने त्यांच्या डोक्यात मोठा दगड टाकण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्याने जाणाऱ्या काही तरुणांनी त्याला थांबवले व तेथून काढून दिले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी…
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी जखमींची विचारपूस केली. दरम्यान मारहाण करणारे सहाही गुंड घटनास्थळावरून फरार झाले होते. यातील काही नाशिक येथील रहिवासी असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे.
तात्काळ पथक रवाना करत तिघांना केली अटक….
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे पथक रवाना करण्यात आले. यात तीन संशयतांना तात्काळ अटक करण्यात आली उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. तिघही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केल जाणार असून अधिकचा तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहे.