मशालच्या गाडीतून डमी अपक्ष उमेदवार मंगेश कैलास चव्हाण यांचा प्रचार सुरू.
काही षडयंत्री, पाताळयंत्री राजकारण्यांकडून 2014 ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होत आहे का?
चाळीसगाव प्रतिनिधी:–
भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक नंबर ०२ असून निशाणी कमळ आहे. म्हणून मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अनुक्रमांक नंबर २ आणि निशाणी कमळ लक्षात ठेवायचं आहे असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.
मतदानाला अवघे काहीच तास शिल्लक असतानाच उबाठाच्या प्रचार गाडीतुन अपक्ष डमी उमेदवार मंगेश कैलास चव्हाणचे पत्रके वाटप करत असतांना शहरातील सुज्ञ नागरिकांनी या उबाठाच्या गाडीवाल्याला रंगेहाथ पकडले असून चालकाने तशी कबुली देखील दिली आहे. की मशालच्या ऑफिस मधून मला हे डमी उमेदवारचे पत्रके वाटपसाठी देण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मिडियत जोरदार व्हायरल होत असून 2014 च्या निवडणुकीत देखील काही षडयंत्री लोकांनी मतदानाला काही तास बाकी असतानाच अपक्ष उमेदवार स्व.पप्पूदादा गुंजाळ यांनी यांनी पाठिंबा दिल्याची अफवा पसरवली होती. म्हणून आजचा प्रकार समोर आल्याने आता पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे का षडयंत्री लोकांकडून??? अशी चर्चा जोर धरत आहे. विरोधकांकडून जाणून बुजून अनुक्रमांकाबाबत अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. चाळीसगाव मतदारसंघात विकासकामांमुळे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांची एक क्रेझ निर्माण झाली असून विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने मतदारांमध्ये अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. येत्या चोवीस तासांत अजून अशाच प्रकारे विरोधकांकडून काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणून मतदारांनी सावध रहावे व अफवांना बळी न पडता सदसद्विवेकबुद्धीने विकासकामे डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे असे देखील आवाहन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.