चाळीसगावात पत्रकार आले अचानक, वनविभाग घाबरले भयानक..!
बिबट्याचा वनविभागाच्या ताब्यात असताना मृत्यू..? वनविभाग पत्रकारांना का घाबरले?
बिग ब्रेकिंग चाळीसगांव:-
आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी धुळे बायपास रोड वरील स्व.उत्तमराव पाटील वनविभागाच्या सामाजिक वनीकरणाच्या जागेत गणेशपुर शिवारात पकडण्यात आलेले दोघीही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद असताना. एका बिबट्याचा जेरबंद केलेल्या पिंजऱ्यात मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्या ठिकाणी अनेक स्थानिक पत्रकारांनी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही पत्रकाराला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आत जाऊ दिले नाही. उद्यानात आतमध्ये पत्रकारांना का सोडत नाही? किंवा सोडले जात नाही? त्यामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. नेमके बिबट्याचे झाले तरी काय? इतर काही लोकांना त्या ठिकाणी वन विभागाचेही नसताना जाऊ दिले जात होते त्याबद्दल व्हिडिओ पत्रकारांकडे आहे. मात्र पत्रकारांना का जाऊ दिले जात नाही? याबद्दल अनेक शंका निर्माण झालेले आहेत? बिबट्यासोबत वन विभाग नेमकं उद्यानामध्ये काय करत होते, की जे पत्रकार पाहू शकत नव्हते? पत्रकार अचानक आल्याने वनविभाग का घाबरले? पत्रकारांपासून वनविभाग काय लपवत आहे? याचाही अजून पर्यंत त्यांनी खुलासा दिलेला नाही? पत्रकारांचे अनेक प्रश्नांवरही त्यांनी उत्तर दिली नाही? पत्रकारांचे फोन वनअधिकारी उचलत नाही? चाळीसगावातील वनविभाग नेमकं काम करते तरी काय? आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे? बिबटे चाळीसगावच्या परिसरात अशा पद्धतीने ठेवणे व त्यांची निगा राखण्यासाठी नेमकी उपाययोजना केली तरी काय?आज झालेल्या बिबट्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना वनविभागाच्या नियमांचे पालन झाले का? वनविभागाची प्रेस नोट मध्ये परिपूर्ण माहिती नाही? या ठिकाणी डॉक्टर कोण होते त्याबद्दल त्यांची नावे नाही? मानद वन्यजीव रक्षक उपस्थित होते का? त्यांची नावे नाही? प्रेस नोट मध्ये परिपूर्ण माहिती दिसूनच येत नाही? ही प्रेस नोट अधिकृत आहे की नाही, हेही समजत नाही? पहिल्या प्रेस नोटमध्ये म्हणताय की नागपूरवरून आदेश प्राप्त झाले आहे व दुसऱ्या प्रेस नोट मध्ये म्हणताय की नागपूरवरून तोंडी आदेश प्राप्त झाले आहे. नेमके आदेश कोणते प्राप्त झाले हे समजत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. शेवटी एकच प्रश्न की पत्रकारांपासून वन विभाग काय लपवत आहे? पत्रकारांना आत मध्ये का जाऊ दिले नाही? याचे उत्तर वन विभागाकडून हवे आहे. बिबट्या किती तासाच्या आत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडला जातो? परंतु पाच दिवस लोकवस्तीत तेही उत्तमराव पाटील उद्यानात की ज्या ठिकाणी सकाळी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर माणसांची फिरण्यासाठी व्यायामासाठी लहान मुलं यांची ये-जा सुरू असते. त्याच ठिकाणी हे बिबट ठेवल्याने किती मोठा धोका या स्थानिक वनविभागाने निर्माण केला होता हे लक्षात येईल. या सर्वांकडे बघता वनविभागाचे किती निष्काळजीपणे काम आहे हे दिसून येते.
पत्रकारांना न भेटण्याचे कारण या प्रश्नांमध्ये दडले का? त्याबद्दल वनविभाग बोलणार आहे की नाही?
1) बिबट्यांना लहान पिंजऱ्यात बंदिस्त करून इतके दिवस का ठेवले?
2) पकडलेले बिबटे सुरक्षित ठिकाणी हलवले असे वन विभागाकडून का सांगण्यात आले? सुरक्षित ठिकाणी हेच होते का? बिबट्याचा मृत्यू झाला तरी कसा?
3) या दोघेही बिबट्यांना दररोज अन्न,पाणी,औषध उपचार वेळेवर आणि पुरेसे दिले जात होते का?
4) नियमानुसार 24 तासाच्या आत बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात का आले नाही?
5) पत्रकारांना अधिकृत माहिती वनविभाग का देत नाही?
असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे…