महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या चाळीसगावात आरोग्याचा जागर
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहन
चाळीसगाव:- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या चाळीसगाव दौऱ्यावर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने व आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व निरामय सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिराचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्या दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
सदर आरोग्य तपासणी शिबिरास वाडिया हॉस्पिटल मुंबई, व लाइफ केअर हॉस्पिटल नाशिक येथील नामांकित सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार असून या आरोग्य तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी मैदानावर आरोग्य शिबिर संपन्न होत असून या तपासणी शिबिरामध्ये मोफत तपासणी करण्याबरोबरच विविध आरोग्य समस्यांवर निदान तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी ३ वाजेपर्यंत तपासण्या करण्यात येणार आहेत. चाळीसगाव प्रथमच मुंबई व नाशिक येथील नामवंत सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जनतेने या तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान शिवनेरी फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे…..