उन्मेष पाटलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – मंत्री गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटलांच्या टीकेवर जोरदार पलटवार
नाशिक/जळगाव – उबाठा गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांनी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. पिक विमा कर्ज वाटप यास जिल्हा बँक संदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणींवरून तसेच रामदेव वाडी अपघाता संदर्भात उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
उन्मेष पाटील यांनी केलेले टीका व्हिडीओ लिंक:-
उन्मेष पाटलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – मंत्री गिरीश महाजन
उन्मेष पाटलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदेव वाडी अपघात प्रकरणात मी रात्री एक वाजेपर्यंत दवाखान्यात होतो. माझ्याच मतदारसंघातील बंजारा समाजाचे ते गरीब कुटुंबातील लोक आहेत. पोलिसांशी बोलून मी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करायला लावला त्या गाडीत गांजाच्या पुड्या होत्या त्याचा देखील उल्लेख मी पोलिसांना गुन्ह्यामध्ये करायला लावला स्थानिक लोकांनी गाडीवाल्याला मारलं त्यात तो जखमी झाला असून त्याला मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गाडी चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या प्रकरणात वेड्यासारखं काहीही बडबडायचं अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांचा समाचार घेतला आहे. उन्मेष पाटलाला उत्तर देण्याची गरज नाही. उन्मेष पाटलाने 4 जूनला लोकसभेच्या निकालाच्या दिवशी समोर यावे आणि मग बघावे की मतदार संघात आपली पद आणि लायकी काय आहे. नाशिक येथे माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.