प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या समाजाचा भाजपला जाहीर पाठिंबा..
जळगाव लोकसभेची निवडणूक भाजपसाठी अधिक सूखर झाली आहे. या समाजाने भाजपला जळगाव लोकसभेत जाहीर पाठिंबा दिला आहे.
जळगाव– जळगाव लोकसभा गेल्या 35 ते 40 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. एक अपवाद वगळला तर गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव लोकसभेत भाजपचा खासदार विजयी झाला आहे. या निवडणुकीत जळगाव लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यात सामना सुरू आहे. यातच जळगाव लोकसभेत भाजपाला माळी समाजाने जाहीर पाठिंबा दिल्याने वाघ यांचा विजय अधिक सुखर झाल्याचं बोललं जात आहे.
महाजन, चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माळी समाजाचा भाजपाला पाठिंबा….
मंत्री गिरीश महाजन, तसेच चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माळी समाजाने भाजपला जळगाव लोकसभेसाठी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. जळगाव लोकसभेत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माळी समाजाने भाजपला पाठिंबा दिला आहे. जळगाव लोकसभेत माळी समाजाचे मोठे मताधिक्य आहे. याचा फायदा भाजपाला होणार असल्याने स्मिता वाघ यांचा विजय सुखार झाल्याचे बोलले जात आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपाला जाहीर पाठिंबा…
जळगाव लोकसभेत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात माळी समाजाची बैठक पार पडली या बैठकीत मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत माळी समाजाने भाजपला जळगाव लोकसभेसाठी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या पाठिंबाचा मोठा फायदा भाजपला होणार असल्याचा आता बोललं जात आहे.