महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस बरसणार असून भर उन्हाळ्यात या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra rain update:-
महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन उन्हाळ्यात आज पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात पाऊस अशाप्रकारे हजेरी लावत असल्याने नागरिकांना आश्चर्य वाटू लागले आहे. अचानक कोसळू लागलेल्या पावसाचा सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीवर देखील परिणाम पडताना दिसून येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा पाऊस पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुक्काम करणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
ऐन उन्हाळ्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट, कात्रज, कोंढवा या भागांमध्ये पाऊस आणि हजेरी लावली आहे. तर सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या झालेल्या गारपीटीत शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर अहमदनगर, पारनेर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. हवामान विभागाकडून कोणकोणत्या भागात पाऊस पडू शकतो या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
पुण्यात आज पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन दिवस पुण्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो. त्यामुळे पुढील दोन दिवस पुण्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढील दोन दिवस पुण्यात वादळी वाऱ्यासह गारपीट जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 व 12 मे रोजी पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाजा वर्तवण्यात आला आहे. तसेच 13 आणि 14 या तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता?
12 मे रोजी सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच यवतमाळ, नांदेड, लातूर चंद्रपूर, याही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून 12 मे तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट व सोसाट्याचा वारा व जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी काळजी घेण्याच्या आव्हान करण्यात आले आहे.