भाजपवाल्यांनी काम नाही केलं तरी आम्ही आमचे काम इमानदारीने करू.- मंत्री गुलाबराव पाटील
जळगावच्या पाचोरा तालुक्यात महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी...
जळगाव– जळगाव लोकसभेसाठी पाचोरा तालुक्यात महायुतीचा विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या मेळाव्यात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.
पाटील यांनी हिंदीमध्ये शेरोशायरी करत जोरदार भाषण केले. जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नही की, वरना वक्त पहिले हम अमीर हो जाते, हम एक साथ दो नशा नही करते, वरणा वक्त के साथ हम फकीर हो जाते. असं म्हणत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना फुटीचा किस्सा सांगितला आहे. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होत की, शिवसेना पक्षाचा निर्णय चुकीचा झाला आहे. उद्धव ठाकरेंना सांगून मी वीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेलो होतो. उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की गाडी रिव्हर्स घ्या आपण चुकलो आहे. उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही त्यामुळे त्यांना सांगून आम्ही एकनाथ शिंदे बरोबर गेलो.पंधरा दिवसांपूर्वी ज्या करण पवारांनी भाजप सोडली ते आम्हाला गद्दार म्हणताय अशा शब्दात पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना देखील टोला लगावला.
व्हिडीओ बातमी:-
भाजपवाल्यांनी काम नाही केलं तरी आम्ही आमचे काम इमानदारीने करू.- मंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील, किशोर पाटील एका बापाची औलाद आहे. भाजपवाल्यांनी काम नाही केलं तरी आम्ही इमानदारीने काम करू जो होगा हमारा नशीब… आमचं काम हे आग विझविणाऱ्या चिमणी सारखा आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे… अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महायुतीच्या मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली.
व्हिडीओ बातमी:-