एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा
जळगाव येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केले पाठिंब्याचे पत्र
जळगाव – वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे असल्याचं बोललं जात आहे.
यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार राजुमामा भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकलव्य संघटनेचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. आदिवासी भिल्ल समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य संघटना निरंतर लढत असते. एकलव्य संघटनेच्या विचारांच्या माध्यमातून गाव खेड्यावर कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपेक्षित दुर्लक्षित समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलव्य संघटनेचे अभिनंदन केले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ व सबका विकास या धोरणावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघ व 77 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वीर एकलव्य संघटनेने भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
एकलव्य संघटनेचे हे पाऊल अत्यंत अभिमानाचे असून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलव्य संघटनेच्या भूमिकेचे स्वागत केलेले आहे.
यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन राजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर दादा वाघ, प्रदेश सचिव मधुकर पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, जळगाव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजूबाबा सोनवणे, रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष रवि सोनवणे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड आदी उपस्थित होते.