सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणार्या एका आरोपीचा मृत्यू…..
आरोपी लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी होता संबंधित
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला आहे. या आरोपीने कारागृहातच चादरीने स्वतःच्या गळ्याला गळफास लावून घेतला आहे. अनुज थापण असे या मृत आरोपीचे नाव आहे.
अभिनेता सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला असून अजून थापन असं या मृत आरोपीचे नाव आहे. अजून थापन नाव असलेल्या आरोपीने कारागृहातच चादरीने गळा आवळून फाशी घेतली असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. गळफास घेतल्यानंतर अजुन थापन याची प्रकृती चिंताजनक होती. कारागृह पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले. कारागृह पोलीस आज रोजी सकाळी ११:30 ते 12 वाजता कारागृहाची तपासणी करण्याकामी गेले असता आरोपी अजुन थापन याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप या आरोपीवर होता.
14 एप्रिल रोजी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट वर झाला होता गोळीबार…
अभिनेता सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंट वर 14 एप्रिल रोजी दुचाकी वरून आलेल्या दोघांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. दुचाकी वरून आलेले दोघेही आरोपी सलमान खानच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करून पसार झाले होते. पसार झाल्यानंतर ते गुजरात मधील एका मंदिरात जाऊन लपले होते. मुंबई पोलीस तसेच क्राईम ब्रँच टीमने कसोशीने चौकशी करत. दोन दिवसातच गोळीबार करणाऱ्या दोघाही आरोपींच्या मुस्का आवळल्या होत्या. विकी गुप्ता व सागर पाल अशी त्या दोघे आरोपींची नावे होती. या गोळीबार प्रकरणाची सर्वस्व जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली होती.
या प्रकरणात चार जणांना झाली होती अटक…
या प्रकरणात पोलिसांनी अजून खोलात जात तपासाचे चक्र फिरवले. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी गुप्ता व सागर पाल या दोघांनाही शस्त्र पुरवल्याप्रकरणी पंजाब मधून सोनू सुंदर आणि अनुज थापन या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील अजुन थापन याने कारागृहात चादरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता तसेच त्याच्यावर खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.