उन्मेष पाटील, करण पवार भाजपमध्येच आहे आणि उद्याही राहतील….- युवराज जाधव
महाराष्ट्रात सर्वच पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडकी भरली आहे....
जळगाव वृत्तसेवा:- उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेत जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार युवराज उर्फ संभाआप्पा यांच्यावर आरोप केले होते. संजय सावंत यांच्या आरोपांचे युवराज जाधव उर्फ संभाआप्पा यांनी खंडन केले आहे.
संजय सावंत यांनी काय केले होते आरोप ?
संजय सावंत यांनी जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार युवराज जाधवांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. युवराज जाधव हे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यकर्ते असून भाजपनेच शिवसेना (ubt)चे मते खाण्यासाठी त्यांना जळगाव लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची ‘बी’ टीम आहे. असा आरोप संजय सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीवर केला होता…
युवराज जाधव यांनी केले आरोपांचे खंडन….
वचित बहुजन आघाडीचे उमेदवार युवराज जाधव यांनी पत्रकार परिषद घेत संजय सावंत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. पारोळ्यात शिवसेना उबाठाचे पक्षाचे उमेदवार करण पवार यांच्या मालकीचा बार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का याचे उत्तर संजय सावंत यांनी द्यावे तसेच भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत करण पवार यांचे देखील फोटो आहेत याचे उत्तर संजय सावंत यांनी द्यावे. असे प्रति आव्हान युवराज जाधव यांनी सावंत यांना दिले आहे.
शिवसेना उबाठा आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत…
वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांनी भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली आहे. करण पवार यांनी लिहून द्यावे की, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी करतो आहे उद्या भाजपमध्ये जाणार नाही. शिवसेना उबाठा आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशी टीका युवराज जाधव यांनी केली आहे.
दोघेही प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडकी भरली आहे….
भाजप वंचित बहुजन आघाडीचा शत्रू आहे. दोघेही प्रस्थापित पक्षांना आज वंचित बहुजन आघाडीची धडकी भरली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे संजय सावंत आमच्यावर बिनबडाचे आरोप करत आहे. मी किंवा माझे सूचक आणि अनुमोदक भाजपाचे कार्यकर्ते असेल तर मी वंचितच्या उमेदवारी मागे घेईल. संजय सावंत यांना माझे आवाहन आहे असे यावेळी युवराज जाधव म्हणाले…
उन्मेष पाटील, करण पवार भाजपचे आहे आणि उद्याही भाजपचेच राहतील….
उन्मेष पाटील, करण पवार भाजपचे आहे, आणि उद्या पण भाजपचेच राहतील ते भाजप कधी सोडणार नाही. ही भाजपची ‘बी’ टीम आहे असा पलटवार वंचित चे उमेदवार युवराज जाधव यांनी केला आहे. आमदार मंगेश चव्हाण माझे मित्र आहेत. मी मंगेश चव्हाण यांचा कट्टर समर्थक असेल तर त्यांनी सिद्ध करावे. मंगेश चव्हाण यांनी मला सामाजिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्यावर मी गेलो आहे. असे यावेळेस युवराज जाधव म्हणाले…..