राज्यात दुधाला सर्वात जास्त दर देणारा जळगाव जिल्हा- आमदार मंगेश चव्हाण
उन्मेष पाटील यांनी मतदार संघात मुतारी बांधलेली असेल तर दाखवावी
चाळीसगांव प्रतिनिधी:- जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरात रू.2.40 पैसे इतकी तर म्हशीच्या दुध खरेदी दरात रू.2 ची वाढ करण्यात आली आहे. ही फक्त पारदर्शक कारबाळामुळे शक्य झालं आहे. तसेच राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा जिल्हा हा जळगाव असल्याचं दूध संघाचे चेअरमन तथा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आला आहे.
जागतिक पातळीवर दूध भुकटी आणि लोण्याचे दर खालावल्याने परिणामी दुधाचे भाव कमी झाले होते. सरकारच्या निर्णयानुसार 27 रुपयापेक्षा दुधाचे भाव कमी होऊ दिले नाही…आता काही टेंडर जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाने ओपन केले त्यात दहा ते बारा टक्के भाव वाढून मिळाला आहे. तात्काळ दूध संघाने गाई आणि म्हशीच्या दुधाचे दर वाढवले. गाईच्या दुधाचा दर 29 रुपये 40 पैसे तर म्हशीच्या दुधाचा दर 46 रुपये 40 पैसे इतका करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या पाच सहकारी दूध संघा पैकी जळगाव सहकारी दूध उत्पादक संघ सर्वात जास्त भाव देत असल्याची माहिती जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटलांवर जोरदार टीका…..
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दूधच्या भाववाढीवरून आमदार मंगेश चव्हाण व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर मंगेश चव्हाण यांनी दिल आहे..
उन्मेष पाटील यांनी पाच वर्षात मुतारी उभी केली असेल तर दाखवावी:- आमदार मंगेश चव्हाण
उन्मेष पाटील यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. चर्चेत राहण्यासाठी उन्मेष पाटील मोठ्या माणसावर चिखल फेक करतात उन्मेश पाटील यांची दहा वर्षातील राजकीय उपलब्धती काय? मंगेश चव्हाण यांचा सवाल उन्मेष पाटील यांना प्रश्न ? राजकीय विपर्यास करणे हे उन्मेष पाटलांचं काम आहे. उन्मेश पाटील मागील पाच वर्षात मतदार संघात एक प्रकल्प आणू शकले नाही. चर्चेत राहणे मते मतांतरे करणे हे उन्मेष पाटील यांचे काम आहे. त्यांनी त्यांच्या मित्राला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा……:- मंगेश चव्हाण
पाच वर्ष आमदार, पाच वर्षे खासदार असताना उन्मेष पाटलांना दूध संघ, शेतकरी दिसला नाही. सरड्याला लाज वाटेल अशा प्रकारे रंग बदलवायचे हा उन्मेश पाटील यांचा मूळ स्वभाव आहे. आता इलेक्शन देशाचं चालल आहे. उन्मेष पाटील गल्लीवर बोलताय जेव्हा गल्लीत होते तेव्हा दिल्लीवर बोलायचे…. दिल्लीला पाठवलं तर आता पुन्हा गल्ली वर बोलायला लागले. भूतकाळात भविष्य दाखवायचं आणि भविष्यात मागचा भूतकाळ दाखवायचा ही उन्मेष पाटलांची पद्धत आहे.
उन्मेश पाटील हा माणूस खोटं बोलणार आहे:- मंगेश चव्हाण
उन्मेश पाटील यांनी पाच वर्षात मुतारी जरी उभी केली असेल तर दाखवावी. उन्मेष पाटील यांनी अर्धवट रावासारखी अर्धवट माहिती जनतेसमोर देऊ नये. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची बदनामी उन्मेष पाटील यांनी करू नये. पाच वर्ष अयशस्वी खासदार म्हणून उन्मेष पाटील त्यांचं चित्र मतदार संघात आहे.
– मंगेश चव्हाण, भाजप आमदार, चेअरमन जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ..