आमदार मंगेश चव्हाण व प्रतिभा चव्हाण यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक
आडगाव येथील बापाचे छत्र हरवलेल्या दुर्गा च्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची शिदोरी
चाळीसगांव प्रतिनिधी:- आडगाव येथील गरीब शेतमजूर कै.बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अकाली निधन झाले होतेप. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या कै.बापू यांची लहान मुलगी कुमारी दुर्गा हिचे लग्न दिनांक २ मे रोजी ठरले असून ऐन लग्नाच्या महिनाभर अगोदर हा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कै. बापूंच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्न कसे पार पाडावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
शिवनेरी फाउंडेशन कडून दुर्गाला मदत
गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांना कळाली असता त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने कु.दुर्गाच्या लग्नातील १००० वऱ्हाडी लोकांच्या जेवणाचा किराणा बाजार घरपोच सुपूर्द करण्यात आला.
गोपाळ कुटुंबावर कोसळला होता दुःखांचा डोंगर
पतीचे निधनाचे दुःख व तोंडावर आलेले मुलीचे लग्न या विवंचनेत असलेल्या त्या मायमाऊली ला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. यामुळे आमदार मंगेश चव्हाण व प्रतिभा चव्हाण यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक होत असून हे दाम्पत्य नेहमीच तालुक्यातील संकटात अडल्या नडल्या निराधारांच्या पाठीमागे उभे राहतात. यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.