शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा…! आमदारांचे मानले आभार…

(रणधीर जाधव, प्रतिनिधी)
चाळीसगाव शहराचे युवा नेतृत्व राज रमेश पुन्शी यांनी शहरातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे. तसेच त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहे.
बघा ते काय म्हणाले…👇
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चाळीसगाव शहरातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित राज पुन्शी हे प्रबळ दावेदार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करत आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत राज पुन्शी हे एका महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. शहरासाठी त्यांनी एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवल आहे. ते व्हिजन नागरिकांसमोर मांडून जनतेचा विश्वास संपादन करून ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. पुन्शी हे उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांचा त्यांना गाडा अभ्यास आहे. यामुळे आगामी काळात जनतेने त्यांना संधी दिल्यास त्यांच्या माध्यमातून शहराची रूपरेषा बदलायला सुरुवात होईल असे मत नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहे.
पुन्शी यांनी शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देत, आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहे, कारण अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्याला मोठा फटका बसला होता. आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल झाला होता. दिवाळी कशी करायची हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली त्याबद्दल त्यांनी त्यांचे व सरकारचे पुन्शी यांनी आभार मानले आहे.