99 हजार टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारकडून परवानगी
गुजरात वरून 2 हजार मॅट्रिक टन पांढरा कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात उमलले होते पडसाद....
दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून गुजरातहून दोन हजार मॅट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आला होता. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमधून या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या याची दखल घेत केंद्र सरकारने तातडीने शनिवारी अधिसूचना जाहीर केली. व सहा देशांमध्ये 99,150 मॅट्रिक टन लाल कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला. मात्र विरोधकांनी या निर्णयाच्या विरोधात देखील आक्षेप नोंदवला आहे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय जुनाच असून आकडेवारी एकत्र करून नव्याने अधिसूचना जारी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी ही विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.
सरकारने या सहा राज्यांमध्ये दिली आहे कांदा निर्यात करण्याची परवानगी….
बांगलादेश संयुक्त, अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये केंद्र सरकारने लाल कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने गुजरातहून 2 हजार मॅट्रिक पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत याचे पडसाद महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये उमटू नये यासाठी केंद्र सरकारने तातडीने लाल कांदा निर्यातीस परवानगी दिल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.
सरसकट कांदा निर्यात बंदी उठवा, विरोधकांची मागणी….
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे…. सरकारने सरसकट कांदा निर्यात बंदी उठवायला पाहिजे. सरकारने ही अधिसूचना काढणे म्हणजे “दर्यात खसखस” असं म्हणत पाटील यांनी सरकारच्या या निर्णयावर टोला लगावला आहे…