क्राईममहाराष्ट्र

वादग्रस्त पोलिस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित !

संदीप पाटलांची खातेनिहाय होणार चौकशी


जळगाव ब्रेकिंग:- रणधीर जाधव, प्रतिनिधी 

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वादग्रस्त पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी हे आदेश दिले. आमदार मंगेश चव्हाण यांनी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला होता आणि यावेळी त्यांनी एक ऑडिओ क्लिपही ऐकवली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ऐनवेळी महिलेने नंतर तक्रार देईल असे सांगून पोलीस ठाण्यातून निघून गेली होती. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता. परंतु या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सविस्तर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आता अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्फत खातेअंतर्गत प्राथमिक चौकशी होणार असल्याची माहिती दत्तात्रय कराळे यांनी माध्यमांना दिली आहे.

नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण ?

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी २०२३ मध्ये महिलेला एका गुन्ह्यासंबंधी मदत केली. त्यानंतर पीडित महिलेशी मैत्री करुन तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत जवळीक साधत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात अत्याचार करीत तिचे शोषण केले, असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. एवढेच नव्हे तर पीडित महिलेने संदीप पाटील यांची वरिष्ठांकडे तक्रार करेल असे सांगितले असता, संदीप पाटील यांनी महिलेला एसपी, आयजी, डीजी यांना मी घाबरत नाही, पालकमंत्री माझ्या खिशात आहे, आणि तू जर आमदाराकडे गेली तर त्यांना देखील गोळ्या घालून मारुन टाकेल, अशी धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डीग देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ऐकवल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु महिलेने ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे हे प्रकरण शांत झाले होते. परंतु आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेत याबाबत कारवाईची मागणी केली होती. जर एक पोलीस अधिकारी एका लोकप्रतिनिधीला गोळ्या घालण्याची भाषा करत असेल तर सर्वसामान्यांचे काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर याविषयी नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर त्यांनी संदीप पाटील यांच्या निलंबनासह खातेअंतर्गत चौकशीचे आदेश काढले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button