चाळीसगाव बस स्थानकात नव्या बसेस दाखल
आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

चाळीसगाव, वृत्तसेवा:- गेल्या काही वर्षांपासून बस संख्येअभावी प्रवासी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याचे फलित पाहून समाधान वाटले.
चाळीसगाव आगारात यापूर्वीच पाच नवीन बीएस-6 प्रकाराच्या बसेस दाखल झाल्या होत्या. आज दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच नव्या कोऱ्या बीएस-6 बसेस रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर माझ्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्या. आज मी स्वतः नवीन बस चालवून या सेवेचा शुभारंभ करण्याचा आनंद घेतला.
आता चाळीसगाव आगाराकडे एकूण १० नवीन बसेस उपलब्ध आहेत.
याचबरोबर, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अत्याधुनिक ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेस देखील आपल्या सेवेत दाखल होणार आहेत.
लवकरच चाळीसगाव बस स्थानकाचे रूप पलटणार…
तसेच, चाळीसगाव बस स्थानकाचे संपूर्ण रूप पालटून, एअरपोर्ट दर्जाचे भव्य व प्रशस्त बस स्थानक बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही वर्षांत हेही काम पूर्ण होऊन हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.