ताज्या बातम्या

“समाजाला माऊली होता आल पाहिजे”- प्रकाश पाठक

सेवा सहयोग फाउंडेशन आयोजित स्नेहमिलन सोहळा संपन्न 


चाळीसगाव, प्रतिनिधी:- 

“अजूनही समाजात खूप यातना, दुख दडलेली आहेत. या यातनांना ओळखून समाजातील गुणवतांना साथ दिल्यास नक्कीच या यातनामय समाजाचे दु:ख नाहिसे होईल. यासाठी समाजीतील सज्जन शक्तीने एकत्र आलं पाहिले, जो पर्यन्त चांगली कर्तव्यनिष्ठ माणसे समाजात वाढणार नाहीत तोवर दुर्जनशक्तीच समाजात वाढतांना दिसेल. फक्त चांगली कर्तव्ये करणाऱ्या माणसांनी माऊली होउन समाजाकडे पाहिले पाहिजे ” असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते प्रकाशजी पाठक, धुळे यांनी केले.

ते सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या विदयार्थ्यी विकास योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या विदयार्थी व पालक स्नेहमिलन २०२५ सोहळयाप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नानासाहेब य.ना. चव्हाण महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. शेळके, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, चाळीसगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष भोजराज पुंन्शी, स्वयंदिप संस्थेच्या मिनाक्षी निकम, डॉ. उज्ज्वला देवरे, डॉ. संदिप देशमुख, डॉ. नरेश निकुंभ, सौ.सुचित्रा पाटील, माजी नगरसेवक दिपक पाटील, श्रीकांत मोरकर,नगरसेविका सौ.विजया पवार, वनेश खैरनार आदी मान्यंवर उपस्थित होते.

“तरूणांनी आपल्यातील गुण ओळखावे. तुम्हाला परिस्थिती कधीही आडवी येत नाही. जो रात्रीची झोप घेवून दिवसा स्वप्नं पाहतो तोच काहीतरी नवनिर्माण करतो ,” असे यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. तर डॉ. नरेश निकूंभ यांनी आपण प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे लागतो, प्रत्येकाला मदत करणे हिच देशाची संस्कृती आहे. विदयार्थ्यांना करत असलेल्या मदतीमुळे आपण खऱ्या अर्थांने देशाची सेवा करीत आहात असे प्रतिपादन केले. यावेळी ज्या विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली अश्या विदयार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे संचालक गुणवंत सोनवणे म्हणाले की, संस्थेचे अध्यक्ष मा.रवीजी कर्वे यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित विद्यार्थी विकास योजनेतून आजपर्यंत जवळपास २७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी साधारणपणे ३४ कोटी रुपयांची आर्थिक मदत झालेली आहे.यंदाच्या वर्षी खान्देश विभागात एक कोटी रूपयांची मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती अभावी कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, समाजात असे गुणवंत विदयार्थी असल्यास नक्की आम्हाला कळवा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.याप्रसंगी पालक कार्यकर्ते डॉ.प्रा.एस.एन.पाटील यांना पी.एच्.डी.मिळाल्याबद्दल व सौ.विद्या पाटील यांना सेट परीक्षा उत्तीर्ण झालेबद्दल तसेच चाळीसगाव तालुक्यातील अती दुर्गम भागातून आलेला विद्यार्थी चि.शुभम राठोड याची भारतीय नौसेनेत वैद्यकीय सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल स्नेहपूर्वक सत्कारीत करण्यात आले‌.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पाटील, पंकज पाटील, दिपक पाटील, सोमनाथ माळी, पालक कार्यकर्ते गणेश आढाव, प्रा. डॉ. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. विजय शिरसाठ, प्रा. आकाश धुमाळ, मयूर घाडगे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सुभाष उगले तर आभार डॉ. जी. डी. देशमुख यांनी मानले .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button