उज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात पहा कोणत्या पक्षाकडून मिळाली उमेदवारी…..
उज्वल निकम काँग्रेसच्या या उमेदवाराच्या विरोधात लढवणार निवडणूक.....
मुंबई वृत्तसंस्था:– ज्येष्ठ विधी तज्ञ उज्वल निकम हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उज्वल निकम हे लोकसभेची निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मूळ जळगाव येथील असलेले उज्वल निकम यांना अखेर भाजपने लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. निकम यांना मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे..
उज्वल निकम कोणाच्या विरोधात लढवणार निवडणूक…?
मुंबई उत्तर मध्यमधून भाजपने ज्येष्ठ विधीतज्ञ उज्वल निकम यांना लोकसभेचे उमेदवारी दिली आहे. माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्या विरुध्द निकम हे उमेदवारी लढवणार आहे. उज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्य मधून उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होणार आहे…..
उज्वल निकम लोकसभा लढवणार असल्याच्या होत्या चर्चा….
उज्वल निकम हे मूळचे जळगाव येथील असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की ते भाजप कडून जळगाव लोकसभेची निवडणूक लढवणार मात्र जळगाव येथील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष यांचे तिकीट कापून भाजपने धक्का तंत्राचा वापर करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. आणि यानंतर उज्वल निकम हे जळगाव लोकसभेची निवडणूक लढवणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता….
अखेर भाजपकडूनच मिळाली उज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी…
उज्वल निकम भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार अशा चर्चा केल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या आज उज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी दिल्याने अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहे.