चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार….
मोठ्या चेहऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश...
चाळीसगांव:- तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील वडगावलांबे येथील मोठ्या चेहऱ्यासह चारशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात वडगावलांबे येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
तालुक्यातील वडगावलांबे या गावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला. गावाच्या विकासासाठी मोठा निधी आमदारांनी उपलब्ध करून दिल्यामुळे गावकऱ्यांकडून आमदार मंगेश चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला गावकऱ्यांनी चव्हाण यांचे आभार देखील मानले.
लोकप्रतिनिधींसह 400 कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश….
आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांबे वडगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधीनसह 400 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला…
आमदार मंगेश चव्हाण यांनी गावकऱ्यांची मने जिंकली…
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांना लांबे वडगाव मधून खूप कमी मताधिक्य मिळाले होते तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावाने महाविकास आघाडीलाच मताधिक्य दिले. असे असतानाही कुठलाही दुजाभाव न करता जवळपास नऊ कोटी पेक्षा जास्त निधी गावाच्या विकासासाठी दिला. यासाठी गावकऱ्यांनी आमदारांचे कौतुक करत आभार मानले गाव विरोधात असतानाही गावाच्या विकासासाठी भरपूर निधी देऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी गावकऱ्यांची मने जिंकली….