माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख धरणे आंदोलनाला बसणार ?
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगाव येथे महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव:- प्रतिनिधी, रणधीर जाधव :-
गेल्या अनेक दिवसापासून वेगळ्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला वारंवार सूचना देऊन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे येणाऱ्या २१ तारखेला सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनाचा निर्णय माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या वतीने घेतला असून, त्यासंदर्भात आज दि.१८ रोजी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
गेल्या दोन वर्षापासून शेतकरी होरपळतो आहे. शेतकऱ्याना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना अंगठ्यावर कर्जमाफी दिली त्या पद्धतीने कर्ज माफी देण्यात यावी. दूध उत्पादकांना पाच रुपये जो अनुदान फरकरुपी देण्यात येणार होता. त्याचे अद्याप पावतो कार्यवाही झाली नाही, प्रस्ताव सादर करून त्याला अनुदान देणे. दुष्काळाचा अनुदान जे 137 कोटी पैकी 70% पेक्षा जास्त अनुदान अद्याप पावेतो शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. ई केवायसीच्या नावाखाली त्याला फिरविण्यात येते आहे. तात्काळ सात दिवसाच्या आत अनुदान दिले जावे. दुष्काळाच्या अनुषंगाने मनरेगातून मागेल त्याला विहिर मागेल त्याला शेततळे अस्तरीकरणसह , मागेल त्याला फळबाग आणि गाय गोठा या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून मान्यता घेत प्रस्ताव मंजूर करून त्या संदर्भात गावपातळीवर अभियान राबवावे. शेतकरी बांधवांना शेती करत असताना लोडशेडींगला सामोरे जावे लागत आहे. लोड शेडिंग बंद करून दिवसा लाईट देऊन शहरातल्या लोकांना देखील लोडशेडींग मुक्त करत असताना स्मार्ट मीटर हे चाळीसगाव तालुक्यात बसवले जाणार नाही. याची हमी विद्युत विभागाकडून देण्यात यावी. अश्या विविध प्रकारच्या बळीराजाच्या जीवनाशी निगडीत महत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देवून आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती….
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्रबापू पाटील, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, तालुका संघटक सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील, शेतकरी गटाचे भैयासाहेब पाटील, नगरसेवक सदाशिव आप्पा गवळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल बापू निकम, जिल्हा सरचिटणीस देवेंद्रसिंग पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष एड. राहुल जाधव, हनुमंत जाधव, दादाभाऊ पाटील, मुकेश गोसावी, अल्पसंख्याक आघाडीचे जावेदभाई शेख, रावसाहेब महाले, ललित बिडे यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.