उत्तर महाराष्ट्रराजकारण

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मिता वाघांना निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली…

मंगेश चव्हाण यांना स्वतःच्या गावात लीड मात्र चुकीच्या बातम्या का पसरवल्या गेल्या ?


चाळीसगांव – प्रतिनिधी, रणधीर जाधव

जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगाव विधानसभेचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे या मूळ गावातून मताधिक्य न मिळाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या होत्या. मात्र तथ्य नसलेल्या व खोट्या माहितीवर आधारित आकडेवारी प्रकाशित केलेल्या त्या बातम्या होत्या खरंतर प्रशासनाकडून अधिकृत बूथनिहाय मतदानाची आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या आकडेवारीवरून आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे या दोन्हीही गावातील तिघही बुथवर भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यापेक्षा 573 मतांचे मताधिक्य असल्याचे स्पष्ट होते. दुसऱ्या बूथवरील मतदानाची आकडेवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या गावातील असल्याची भासवण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्रांनी केला. मिळालेल्या आकडेवारीची कोणतीही खातरजमा न करता खोट्या आकडेवारीवर आधारित बातम्या वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या हे स्पष्ट झाले आहे.

कुणाच्या सांगण्यावरून वृत्तपत्रांनी खोट्या बातम्या प्रकाशित केल्या ? 

जळगाव लोकसभेच्या निकालाची अधिकृत आकडेवारी वृत्तपत्रांना मिळाली नाही का ? खोटी आकडेवारी वृत्तपत्रांना कोणी पुरवली हा खुलासा संबंधित वृत्तपत्रांनी केला पाहिजे. चुकीच्या बातम्या प्रकाशित केल्याने भाजप आमदार मंगेश चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलीन करण्याचे काम झाले आहे. असा आरोप चाळीसगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीने केला आहे. या बातमी संदर्भात संबंधित वृत्तपत्रांनी जाहीर खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम यांनी केली आहे. पत्रकारांना चुकीची आकडेवारी कोणी दिली हे तरी संबंधित वृत्तपत्रांनी स्पष्ट केलं पाहिजे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मिता वाघांना निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली

भारतीय जनता पार्टीने आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव लोकसभा मतदार संघाचे महायुतीच्या समन्वयक पदी नियुक्ती केली होती. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मंगेश चव्हाण यांनी मित्र पक्षांशी समन्वय साधून स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेतून निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली पहिल्या दिवसापासूनच मतदार संघात चव्हाण यांनी प्रचाराचा धडाका लावला. आमदार मंगेश चव्हाण यांनी संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. चाळीसगाव मतदार संघात मताधिक्य राखण्याच्या आव्हान असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मिता वाघ यांना तब्बल 16 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य आपल्या मतदारसंघातून स्वतःच्या नेतृत्वात मिळवून दिल.

वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न ?

विशेष म्हणजे चाळीसगाव मतदार संघातील सातही जिल्हा परिषद गटात स्मिता वाघ यांना मताधिक्य मिळाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत व भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक उमेदवार दिलेला असताना चाळीसगाव मतदारसंघाच्या गावांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उमेदवारांना मताधिक्य मिळाले होते अशा अनेक गावांना यावेळी भारतीय जनता पक्षाने मताधिक्य मिळवत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली आहे. मात्र काही ठराविक वृत्तपत्रातून खोट्या बातम्या प्रसारित करून विरोधकांकडून सोशल मीडियावर आमदार मंगेश चव्हाण यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी भाजपला अपयश कसे आले हे पटवण्याचा त्यांचा कवीलवाला प्रयत्न चालला आहे. विशेष म्हणजे चाळीसगाव मतदार संघाशी निगडित माहिती ही जळगाव प्रतिनिधीच्या नावाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते त्यामुळे वृत्तपत्रांच्या बातमीदारी बद्दल साहजिकच कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण निर्माण झाले तर ते चुकीचे ठरत नाही व अशा बातमीदारीबद्दल शंका निर्माण होते.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या गावात स्मिता वाघ यांना मिळालेले मताधिक्य….

हिंगोणे खुर्द:-

बूथ क्रमांक- 133

करण पवार- 114, स्मिता वाघ- 218

(स्मिता वाघ मताधिक्य:- 104)

बूथ क्रमांक:- 134

करण पवार- 119, स्मिता वाघ- 285

(स्मिता वाघ मताधिक्य:- 166)

हिंगोणे सिम:-

बूथ क्रमांक:- 135

करण पवार- 171, स्मिता वाघ- 474

(स्मिता वाघ मताधिक्य:- 303)

एकूण मिळालेले मताधिक्य:- 573


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button