शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई द्या रयत सेनेची मागणी….
रयत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
चाळीसगांव- (प्रतिनिधी, रणधीर जाधव)
मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई पिक विमा कंपनीने देण्याची जबाबदारी असताना देखील मोजक्याच शेतकऱ्यांना पिक विमा दिला असून उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित राहावे लागल्यामुळे लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दि १० रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान….
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान होत असल्याने शेतात केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे शेतकऱ्याला शासन देखील वाली नसल्यामुळे अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असताना शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे न्याय कोणाकडे मागावा या विवंचनेत महाराष्ट्रातील शेतकरी सापडला आहे . मागील वर्षी चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पिक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देण्याची नितांत गरज असताना देखील काही प्रमाणात शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली उर्वरित वंचित शेतकरी मात्र अजूनही पीक विम्याची रक्कम मिळण्याच्या आशेने शासनाकडे वारंवार मागणी करत आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेती हंगामाच्या मोसमावर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचे निर्देश चाळीसगाव तहसीलदार यांनी संबंधित पीक विमा कंपनी ला द्यावे यासाठी रयत सेनेने दि १० रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे रक्कम न मिळाल्यास रयत सेना शेतकऱ्यांना सोबत घेत चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे,
यांची होती उपस्थिती…
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, मा. नगरसेवक अनिल (हरिनाना) जाधव, प्रा चंद्रकांत ठाकरे, प्रा तुषार निकम, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष किरण पवार, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे ,संघटक दीपक देशमुख, अरविंद पाटील ,अजय माने, विश्वास पगारे, सुनील पवार ,गिरीश देशमुख,बाळू शिंदे,हेमंत पाटील ,मराठा महासंघाचे खुशाल बिडे, शेकापचे गोकुळ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.