नीट परिक्षेतील घोटाळयामुळे विदयार्थ्यांचे भविष्यं धोक्यात
हजारो विदयार्थ्यांचा तहसिलवर मोर्चा, परिक्षा पून्हा घेण्याची मागणी
चाळीसगांव:- (प्रतिनिधी, रणधीर जाधव)
देशात वैदयकिय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एनटीए तर्फे घेण्यात येणाऱ्या नीट 2024 च्या परिक्षेत घोटाळा झाल्याने अनेक विदयार्थ्यांचे भविष्यं धोक्यात आले आहे. या पाश्वभुमिवर हजारो विदयार्थ्यांनी चाळीसगाव तहसिलवर धडक मोर्चा काढला. यावेळी नीट ची परिक्षा पुन्हा घेण्यात यावी अश्या मागणीचे पत्र तहसिलदार प्रशांत पाटील यांना विदयार्थ्यांमार्फंत देण्यात आले.
देशात एनटीए तर्फे वैदयकीय अभ्यासक्रमांसाठी नीट 2024 परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल जाहिर होताच एकाच परिक्षा केंद्रावरील 67 विदयार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले. त्याच बरोबर अनेक संशयास्पंद बाबी दिसून आल्याने देशातील विदयार्थ्यांकडून परिक्षेत मोठया प्रमाणात भष्ट्राचार करत काही विदयार्थ्यांना जास्तीचे मार्क देण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विदयार्थ्यी तीन ते चार वर्षे या परिक्षेसाठी तयारी करीत असतात. देशातील इतक्या मोठया परिक्षेत घोटाळा होत जास्तीचे मार्क दिले जात असतील तर कष्टं करून अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांचे भविष्यं अंधारात असल्याचे मत पालकांनी मांडले. या प्रकरणाची चौकशी व्हावी व परिक्षा पुन्हा घेण्यात यावी अश्या मागणीसाठी शहरातील विदयार्थ्यांनी शहरातील जेता सायन्सं अकॅडमी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विर सावरकर चौकातील तहसिल कार्यालय पर्यन्तं मोर्चा काढला. यावेळी एनटीए चोर है, विदयार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका, आम्हाला न्याय दया अश्या विविध घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता. तहलिदार प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जेता सायन्सं अकॅडमीचे संचालक श्रीकांत मोरकर, डॉ. दिपकसिंग मोरकर, निलेश ढोले, गजानन तायडे, डॉ. मनिषा मोरकर, शशी कूमार, प्रदिप पटेल, एम. डी. नाझीर, स्मीता सोनार व मोठया संख्येने विदयार्थी उपस्थित होते.
लहानपणापासून डॉक्टरं होण्याचे स्वप्नं होते. इतकी मेहनत करून परिक्षा दिली. या घोटाळयामुळे सर्व स्वप्नं पाण्यात मिळाले. फक्तं श्रीमंताच्या मुलांनी यापुढे डॉक्टरं व्हायच का, आम्हाला न्याय दया, परिक्षा पुन्हा घ्या.
मानसी महाजन, विदयार्थी
यामुळे देश मोठया संकटात सापडेल. विदयार्थ्यांचा परिक्षेवरील विश्वास उडूल जाईल. असे लोक जर डॉक्टंर झालेत तर यांच्याकडून रूग्ण्ंसेवा घडूच शकत नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी
कृशाली बाविस्कंर, विदयार्थी
या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, यात दोषींना कडक शिक्षा करत पून्हा असे प्रकार घडू नये म्हणून स्वतंत्र यंत्रणा राबवावी. नीट परिक्षा पुन्हा पारदर्शक पणे घ्यावी.
प्रविण महाजन, पालक